Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात 192 रूग्ण झाले ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Corona | शहरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याचं समोर येणार्‍या आकडेवारीवरून स्पष्ट (Pune Corona) होत आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 170 नवे रूग्ण आढळले आहेत तर दिवसभरात 192 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 4 लाख 99 हजार 788 वर जाऊन पोहचली आहे. समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 4 लाख 89 हजार 206 रूग्ण बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या पुणे शहरात कोरोनाचे 1 हजार 573 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.
एकुण सक्रिय रूग्णांपैकी 178 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पुणे शहरातील तब्बल 9 हजार 9 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरात 8 हजार 458 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते.
त्यापैकी 170 रूग्णाचा कोरोनाचा अहवाल हा सकारात्मक आला आहे.

Web Title : Pune Corona | In the last 24 hours, 192 patients in Pune became ‘corona free’, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | बिबवेवाडी, धनकवडी येथील पुनर्वसन योजनेतील निवासी गाळे हस्तांतरणास सर्वसाधारण सभेची मंजुरी; परंतू…

Thackeray Government | महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासाठी अध्यादेश काढणार – ठाकरे सरकार

Former MLA Mohan Joshi | बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा फेरविचार करा – माजी आमदार मोहन जोशी