Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 197 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये रविवारी (दि.19) 145 कोरोनाबाधित (Pune Corona) आढळून आले आहेत. तर 197 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. आज विविध तपासणी केंद्रावर 7 हजार 697 संशयितांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये 145 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (positive Report) आला आहे. शहरात कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या कमी झाली आहे.

पुणे शहरातील (Pune City) सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 725 इतकी झाली आहे. आज दिवसभरात 06 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 2 रुग्ण पुण्याबाहेरील आहे. तर 4 रुग्ण शहरातील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये 9 हजार 001 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आरोग्य विभागाने (Health Department) दिली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या 178 इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 290 इतकी आहे.
शहरात आत्तापर्यंत 32 लाख 85 हजार 556 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
यापैकी 4 लाख 99 हजार 373 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
तर यापैकी 4 लाख 88 हजार 647 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

हे देखील वाचा

PMC Recruitment 2021 | पुणे महापालिकेत ‘या’ 203 पदांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर

तुमचे सुद्धा Aadhaar-Pan Card लिंक नाही का?, जाणून घ्या काही मिनिटात कसे करावे लिंक?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Corona | In the last 24 hours, 197 patients of ‘Corona’ were discharged in Pune city, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update