पुण्यातून ‘कोरोना’ नष्ट करण्यासाठी महापौरांनी अजित पवारांकडे केल्या ‘या’ 6 मागण्या, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील कोरोना संसर्ग निर्मूलन आढावा बैठक पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या बैठकीत पुणे शहराच्या वतीने विविध मुद्दे मांडून राज्य सरकारकडे मागण्या करण्यात आल्या आहे. तर जाणून घेऊया महापौरांनी कोणत्या मागण्या सरकारकडे केल्या आहेत.

१. सध्याचा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पाहता जुलैअखेर रुग्णांची संख्या ४७ हजारांच्या पुढे जाईल. याचा विचार करता आयसोलेशन बेड्स ६१४, आयसीयू बेड ४००, व्हेंटिलेटर बेड्स २०० ने कमी पडू शकतील. तरी राज्य सरकाच्यावतीने बेड्स उपलब्ध करुन देण्यात यावे.

२. खाजगी लॅब व खाजगी रुग्णालय यांचा आणि महापालिकेचा समन्वय राखणे अधिक गरजेचं आहे. त्यासाठी राज्य सरकारने भूमिका घ्यावी.

३. महापालिकेच्या शहरी गरीब योजनेअंर्तगत ८० रुग्णालयांना कोरोना संसर्गाच्या उपचारासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दर महिन्यास २५ कोटींचा अतिरिक्त भार महापालिकेवर येणार आहे. आधीचे १७५ कोटी आणि आत्ताचे २५ कोटी असा आर्थिक बोजा महापालिकेवर पडणार आहे. तरी राज्य सरकारने यासंदर्भात विचार करण्याची गरज आहे.

४. खाजगी लॅबच्या माध्यमातून स्वॅब तपासणीसाठी प्रतिरुग्ण १८०० रुपये महापालिका निधीतून उपलब्ध करुन देणार आहे. टेस्टिंग क्षमता वाढवणे, महापालिकेच्या यंत्रणांमध्ये डॉक्टर, नर्स व पॅरामेडिकल स्टाफची आवश्यकता आहे. तरी ती तात्काळ पूर्व करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

५. आर्थिक परिस्थिती चांगला असलेला रुग्ण खाजगी रुग्णालयात चाचणी करता गेल्यावरती अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर तीव्र, मध्यम लक्षणे आहेत. ते न पाहता सर्व कुटुंबासाठी ४ ते ५ बेड्स आरक्षित करतात. त्यामुळे गंभीर रुग्णाला बेड्स मिळत नाहीत. याबाबत खाजगी रुग्णालयांना आदेश दिले पाहिजेत असं देखील त्यांनी सांगितलं.

६. आर्थिक क्षमता चांगली असणाऱ्या नागरिकांनी, त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यावरती महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटर, आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल व्हावं. जेणेकरुन खाजगी रुग्णालयात गंभीर रुग्ण आणि कोरोना संसर्गित रुग्णाची खासगी रुग्णालयात जागा उपलब्ध होण्याचा दृष्ठीकोनातूनन खाजगी रुग्णालयांनी विचार करावा त्यासंदर्भात सूचना मांडल्या.