Pune Corona | नीती आयोगाकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा, तज्ज्ञांनी पुणेकरांना दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corona | नीती आयोगाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा (Covid 3rd Wave) दिला असून तब्बल दोन लाख ऑक्सिजन बेड तयार करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांनी पुणेकरांना मास्क काढून बिनधास्त न फिरण्याचा सल्ला (Pune Corona) दिला आहे.

गेल्या महिन्याभरापासून शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी झालेली दिसत आहे. त्यामुळे निर्बंध पूर्णपणे शिथिल केले आहेत. दिवसभर दुकाने, हॉटेल्स, मॉल्स, कार्यालये नियमित सुरू होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाचे संकट संपले असल्याची भावना निर्माण झाली असल्याने निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले. बहुतांश नागरिक मास्क वापरत नाहीत., शिवाय गर्दीही मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट टाळायचे असेल तर मास्कचा वापर आवर्जून करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोना काळात मास्कची विक्री मोठ्या प्रमाणात होत होती. ‘एन ९५’ पासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या मास्कची ७० ते ८० टक्के विक्री होत असे. मात्र महिन्याभरापासून हीच विक्री १० ते २० टक्क्यापर्यंत आली आहे, अशी माहिती औषध विक्रेते चेतन शहा यांनी सांगितली. कोरोनाच्या संसर्गाबरोबर हवेतील प्रदूषणापासूनही मास्क मुळे संरक्षण होते. त्यामुळे स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी मास्कशिवाय बाहेर पडू नये. असे पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनकडून सांगण्यात येत आहे.

Pune News | पुण्यातील शिवसैनिक आक्रमक; भाजप कार्यालयात सोडल्या कोंबड्या (व्हिडीओ)

गेल्या दीड वर्षापासून सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मात्र, कोरोनाची लाट जरी ओसरली आहे आणि निर्बंध शिथिल केले आहे तसे रस्त्यावरून बहुतांश
जण मास्क न लावता फिरताना दिसतात. विशेषतः दुचाकीवरून फिरणारे तरुण योग्य पद्धतीने मास्क घालत नाहीत.

पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आणि निर्बंध शिथिल झाले. त्यामुळे कोरोनाचे संकट
टाळले असे लोकांना वाटू लागले. त्यामुळे मास्क न घालता लोक दिसत आहे पण मास्कचं महत्त्व
आता वाढलंय. श्वसनसंस्थेवर परिणाम करणारा हा विषाणू जोपर्यंत आहे, तोपर्यंत मास्कचे महत्त्व
कायम राहणार आहे, असे सार्वजनिक आरोग्य खात्याकडून सांगण्यात येत आहे.

कोरोनाबाधीत रुग्णांच्या शिंकण्यातून, खोकण्यातून उडणाऱ्या शिंतोड्यातून विषाणूंचा संसर्ग होतो.
त्याला प्रतिबंध करण्यासाठी मास्क महत्त्वाचा ठरतो. तसेच, निरोगी व्यक्तीला संसर्गापासून
प्रतिबंधासाठी मास्क उपयुक्त ठरतो.

सार्वजनिक ठिकाणी, बंदीस्त वातानुकूलित कार्यालयांत, हॉटेलमध्ये प्रवेश करताना, गर्दीच्या ठिकाणी, मॉल्स खरेदी करताना, रुग्णालयांमध्ये आदी ठिकाणी मास्कचा वापर करावा . दोन वर्षापुढील लोकांनी मास्क लावणे आवश्यक आहे. लहान मुलांना ‘एन ९५’ मास्क लावण्याची गरज नाही. पण, अजून पुढे किमान वर्ष ते दोन वर्ष मास्क वापरत रहाणे गरजेचे आहे. लहान मुलांचे अद्यापही लसीकरण सुरू नाही. ते सुरू झाल्यानंतरही मोठ्यांनी आणि लहान मुला-मुलींनी मास्क लावणे आवश्यकच आहे.

हे देखील वाचा

LIC Special Revival Campaign | बंद पडलेली LIC पॉलिसी पुन्हा करू शकता सुरू, जाणून घ्या कोणत्या अटींचे करावे लागेल पालन

Pune Farmer Suicide | आत्महत्येनंतर संबंधितांवर गुन्हे दाखल होतील पण, माझे वडील पुन्हा परत येतील का?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Corona | Policy Commission warns of third wave of corona, experts give important advice to Punekars, find out

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update