Pune Corona Restriction | ‘पालकमंत्री एक, आरोग्यमंत्री दुसरं आणि मुख्यमंत्री तिसरंच बोलतात’

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने निर्बंध लागू केले. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्यातील निर्बंध शिथिल केले. मात्र, यामधून पुण्यासह (Pune Corona Restriction) 11 जिल्ह्यांना वगळण्यात आले. पुण्यातील निर्बंध कायम (Pune Corona Restriction) ठेवले. दुसरीकडे मुंबईतील दुकाने, कार्यालये आठवड्यातील सर्व दिवस रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली. यावरुन पुणे-मुंबईला वेगळा न्याय का असा सवाल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी उपस्थित केला आहे.

राज्य सरकारने सोमवारी राज्यातल्या 25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिलता (Restriction relaxation) देण्याचा निर्णय घेतला. तर 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल 3 चे निर्बंध (Level 3 Restrictions)
कायम ठेवण्यात आले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्याचा (Pune district) समावेश आहे.
मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये दुजाभाव का ? असा सवाल करत पुण्याबाबत पालकमंत्री
(Guardian Minister) एक बोलतात, आरोग्यमंत्री (Health Minister) दुसरं आणि मुख्यमंत्री
(CM) तिसरंच बोलतात, असा हल्लाबोल महापौरांनी राज्य सरकारवर केला आहे.

 

व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) 4 टक्क्यांच्या आत असतानाही लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवणे हा पुणेकरांवर अन्याय आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? शहरात सलग महिनाभर पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या खाली नोंदवला गेला. या पार्श्वभूमीवरच पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत निर्बंधातील शिथिलतेबाबत मागणी करत आलो. महापौर म्हणून मी शहरातील व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून याबाबत राज्य सरकारने न्याय देण्याची भूमिकेत रहावे, असे मोहोळ यांनी म्हटले आहे. राज्य सरकारच्या विरोधात व्यापाऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे महापौर यांनी स्पष्ट केलं आहे.

पुण्याबाबत सरकार राजकारण करतंय

राज्यातील 11 जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. तसेच संक्रमणाचा दरही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. या जिल्ह्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे निर्बंध कायम ठेवले आहेत. परंतु निर्बंध हटवण्यावरुन राज्य सरकार पुण्याच्या बाबतीत राजकारण करत असल्याचा आरोप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.

 

Web Title : Pune Corona Restriction | pune mayor murlidhar mohol alligation on maharashtra govt on corona ristriction in pune city

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | आंबेगाव पठारमध्ये प्रभू श्रीरामाचं शिल्प उभारण्यासाठी 2 कोटी रुपये निधी ! नगरसेविका वर्षा तापकीर यांचा पुढाकार

Pune Rural Police | सराईत राण्या बाणखेले खून प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Sangli Crime | आईनेच घेतला 2 वर्षाच्या चिमुकलीचा जीव, सांगलीतील धक्कादायक घटना