Pune : कोरोना नियमांचे उल्लंघन ! भाजप आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर FIR

भोसरी : पोलीसनामा ऑनलाइन – भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मुलीचा 6 जून रोजी विवाह सोहळा असून, त्यापूर्वी रविवारी (दि.30) झालेल्या मांडव सोहळ्यात त्यांनी कार्यकर्त्यांसह भंडारा उधळून डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. भाजप आमदार महेश लांडगे यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यासह इतर 60 जणांवर भोसरी पोलीस Bhosari Police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : पुणेकरांसाठी मोठा दिलासा ! उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार

आमदार महेश किसनराव लांडगे, सचिन किसनराव लांडगे, अजित सस्ते, कुंदन गायकवाड, राहुल लांडगे, दत्ता गव्हाणे, गोपी कृष्ण धावडे, सुनिल लांडे, नितीन गोडसे, प्रज्योत फुगे (सर्व रा. भोसरी) यांच्यासह 40 ते 50 अनोळखी लोकांवर भोसरी पोलीस Bhosari Police ठाण्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस Bhosari Police ठाण्याचे अंमलदार सुरेश नानासो वाघमोडे (वय-32) यांनी फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार महेश लांडगे यांची मुलगी साक्षी हिचा विवाह 6 जून रोजी होणार आहे. विवाह सोहळ्यापूर्वी रविवारी मांडव डहाळे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन आमदार लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे यांनी महेशदादा स्पोर्ट फाउंडेशन भोसरी गावठाण येथे सायंकाळी साडे सहा वाजता केले होते. या कार्यक्रमात आमदार लांडगे, अजित सस्ते यांच्यासह इतर 40 ते 50 लोक परवानगी नसताने एकत्र जमले. तसेच विनामास्क व सामाजीक अंतर न ठेवता कार्यक्रमात डान्स केला.

Video : ‘महाविकास’ सरकारमधील नेत्यांवर भडकले फडणवीस, म्हणाले – ‘ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मोर्चे काढत होते’

आमदार महेश लांडगे यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींनी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करुन स्वत:च्या व इतरांच्या जीवीताला धोका निर्माण केला. भोसरी पोलिसांनी आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

Pune : भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्‍या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी

रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, म्हणाले – ‘राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत’