Pune Corona Third Wave | ‘कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे, परंतू संपणार कधी हे अभ्यासाअंती सांगता येईल’ – महापालिका आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corona Third Wave | पुण्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचे दिसत (Pune Corona Third Wave) आहे. ही लाट केंव्हा संपेल हे अभ्यासाअंती सांगता येईल. तिसर्‍या लाटेत सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, महापालिकेने (Pune Corporation) उपचारासाठी मोठ्याप्रमाणावर बेडस्ची तयारी ठेवली आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती (Dr Ashish Bharti PMC) यांनी आज सर्वसाधारण सभेमध्ये (PMC GB) दिली.

 

शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार (Shiv Sena group leader Prithviraj Sutar), मनसेचे गटनेते साईनाथ बाबर (MNS group leader Sainath Babar), कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल (Congress group leader Aba Bagul) आणि विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (Leader of Opposition Deepali Dhumal) आणि सभागृहनेते गणेश बिडकर (Leader of the House Ganesh Bidkar) यांनी सर्वसाधारण सभेमध्ये कोरोनाची सद्यस्थिती, उपचार सुविधा आणि लसीकरणाच्या परिस्थितीबाबत उपस्थित केलेल्या मुद्दयांवर डॉ. भारती यांनी स्पष्टीकरण केले. (Pune Corona Third Wave)

डॉ. भारती म्हणाले, की पुण्यातील लाटेचा ग्राफ उतरता आहे. तिसर्‍या लाटेत मृत्युदर कमी आहे.
शहरात आतापर्यंत ४१५ ओमीक्रोन चे रुग्ण आढळले आहेत. ही लाट केंव्हा उतरेल हे अभ्यासाअंती सांगता येईल.
आपल्या बाणेर व नायडू या दोनच रुग्णालयात १८० रुग्ण उपचार घेत असून उर्वरीत बेडस् रिकामे आहेत.
रक्षक नगर येथील विलगिकरण कक्षात फक्त १० रुग्ण आहेत. आपल्याकडे सध्या १३ हजार बेड्स आहेत.
आपण २५ हजारापर्यंत तयार करू शकतो एवढी आपली तयारी आहे.
ऑक्सिजन बेड्स ची गरज लागल्यास हडपसर (Hadapsar) येथील आण्णासाहेब मगर रुग्णालयात ३० बेड्सची सुविधा केलेली आहे.
येरवडा (Yerwada) येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात २०० बेड्स असून तिथे किशोरवयीन मुलांवर उपचाराची सोय केली आहे.
बाणेर चे नवीन व जंबो कोविड रुग्णालय (Jumbo Covid Hospital) देखील अलर्टमोड वर आहेत.

 

कोरोनाचा पहिला डोस ११६ टक्के तर दुसरा डोस ८५ टक्के नागरिकांना देण्यात आला आहे.
१५ ते १८ वर्ष दरम्यानच्या मुलांपैकी ४२ टक्के मुलांना लस देण्यात आली आहे.
१० तारखेपासून बूस्टर डोस (Booster Dose) द्यायला सुरुवात केली आहे.
आतापर्यंत ३० हजार ज्येष्ठ नागिरकाना बूस्टर डोस देण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune Corona Third Wave | ‘The third wave of corona is receding, but it will be possible to say at the end of the study when it will end’ – Municipal Health Chief Dr. Ashish Bharti

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2386 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Crime | सराईत वाहनचोराला खडक पोलिसांकडून अटक, 2 लाखांची वाहने जप्त

 

Pune Corona Updates | दिलासा ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 7410 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी