Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळं 24 तासात 10 जणांचा मृत्यू तर 318 नवे पॉझिटिव्ह, दिवसभरात 205 झाले बरे तर आतापर्यंत 293 जणांचा बळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं देशात जवळपास बर्‍याच राज्यात थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. पुण्यातील मनपा प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24 तास प्रयत्नशील आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनामुळं 10 जणांचा बळी गेला आहे तर तब्बल 318 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांची पुणे शहरातील संख्या ही 293 वर गेली आहे.


पुणे शहरात एकुण 5851 कोरोनाबाधित असून त्यापैकी 3264 रूग्णांवर उपचार झाले असून ते बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी जाण्यासाठी डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2294 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. 150 क्रिटिकल रूग्णांवर उपचार चालू असून त्यापैकी 49 रूग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. आज आढळून आलेल्या 318 पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये ससूनमधील 11, नायडूमधील 236 आणि खासगी रूग्णालयातील 72 रूग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत 3264 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचारानंतर बर्‍या होणार्‍या रूग्णांची संख्या ही सध्या अ‍ॅक्टीव्ह असलेल्या रूग्णांपैकी जास्त आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दररोज 100 हून जास्तच रूग्ण पॉझिटिव्ह आढळून येत असल्यानं पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. प्रशासनानं नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नका. घराबाहेर पडताना मास्क परिधान करा, सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करा असं आवाहन केलं आहे.