Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 116 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिका हद्दीमध्ये कोरोनाची (Pune Corona Update) रुग्णसंख्या कमी होत आहे. तसेच शहरात मागील काही दिवसांपासून शून्य मृत्यूची नोंद होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 116 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 78 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

पुणे शहरातील विविध केंद्रावर आज 2 हजार 245 स्वॅब तपासणी (Swab) करण्यात आली आहे.
यामध्ये 116 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या 6 लाख 61 हजार 439 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 51 हजार 326 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 765 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 09 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर 01 रुग्ण आहे. एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 4.12 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | 116 new corona patients in Pune city in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा