Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 120 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) रुग्ण संख्येत चढ – उतार पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील दैनंदिन रुग्णांची संख्या कमी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 120 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 192 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

पुणे शहरातील विविध केंद्रावर आज 2 हजार 792 स्वॅब तपासणी (Swab) करण्यात आली आहे.
यामध्ये 120 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या 6 लाख 60 हजार 794 इतकी झाली आहे.
यापैकी 6 लाख 50 हजार 715 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
हा रुग्ण शहरातील आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 347 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 732 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 53 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 5 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 6 रुग्ण आहेत. एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 34.83 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | 120 new corona patients in Pune city in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा