Coronavirus : पुण्यात 24 तासात 142 जण झाले ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या मृत्यू आणि पॉझिटिव्हची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या रूग्ण संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. पुण्यात कोरोनामुळं गेल्या 24 तासात 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल 305 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, दिवसभरात 142 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात आतापर्यंत तब्बल 425 जणांचा कोरोनामुळं बळी गेला आहे.


गेल्या 24 तासात आढळून आलेल्या 305 कोरोनाबाधितांमध्ये ससून, नायडू आणि इतर रूग्णालयातील रूग्णांचा समावेश आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 9082 वर जाऊन पोहचला आहे. दरम्यान, आतापर्यंत तब्बल 5924 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ही 2733 आहे. दरम्यान, अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 222 रूग्ण हे क्रिटिकल आहेत. त्यापैकी 49 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासात 12 जणांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील बळींचा आकडा आता 425 वर पोहचला आहे. अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या खुपच अधिक आहे. ही मोठी दिलासादायक बाब आहे.