Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 19 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona Update) संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या पन्नासपेक्षा कमी झाली आहे. शहरात रुग्ण संख्या कमी झाल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 19 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 29 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

शहरातील विविध केंद्रावर आज 1 हजार 262 स्वॅब तपासणी (Swab) करण्यात आली आहे. यामध्ये 019 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या 6 लाख 61 हजार 625 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 51 हजार 713 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. हा रुग्ण शहरातील आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 564 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 02 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर एकही रुग्ण नसून नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 1 रुग्ण आहे.
एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 2.83 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत

 

Web Title :- Pune Corona Update | 19 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

IND vs SL | भारताचा श्रीलंकेला व्हाईटवॉश; रो’हिट’ मॅनच्या कॅप्टन्सीमध्ये केला ‘हा’ मोठा पराक्रम

 

Devendra Fadnavis | फडणवीसांचा डाव उलटणार? नवाब मलिकांच्या मुलीचा खळबळजनक गौप्यस्फोट

 

LIC IPO च्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांनी लक्ष द्यावे, मे पर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो ‘पब्लिक इश्यू’