Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 223 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update) रुग्णांच्या संख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. काल (शनिवार) शहरात 176 रुग्ण आढळून आले होते. तर आज रुग्णसंख्या कमी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 130 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 223 रुग्ण बरे झाले आहेत.

 

आजपर्यंत पुणे शहरात 6 लाख 60 हजार 367 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 49 हजार 790 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 345 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज शहरामध्ये 2 हजार 611 नागरिकांची तपासणी करण्यात आली.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 1 हजार 232 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 70 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Invasive Ventilator) वर 07 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर (Non-invasive ventilator) 09 रुग्ण आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | 223 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

500 Rupees Fake Note Update | 500 च्या बनावट नोटांबाबत आली मोठी अपडेट! जाणून घ्या अन्यथा तुम्हाला लागू शकतो ‘चूना’

 

Burning Bus In Pune | वाढदिवसापेक्षा कर्तव्य महत्त्वाचे ! आग विझवताना कोथरुड अग्निशमन दलाचे अधिकारी गंभीर जखमी; गजानन पाथरुडकर ICU मध्ये

 

Pune Crime | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने उद्योजक महिलेला 1 कोटींचा गंडा; लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात रवि कानकाटे व स्वप्नील कानकाटेविरूध्द गुन्हा