Pune Corona Update | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 5521 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update) रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 2 हजार 846 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 5 हजार 521 रुग्ण बरे झाले आहेत.

 

 

शहरात आजपर्यंत 43 लाख 56 हजार 921 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये 6 लाख 44 हजार 341 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 11 हजार 050 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 07 तर हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 261 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 24 हजार 030 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 301 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Invasive ventilator) वर 48 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Non-Invasive ventilator) 28 रुग्ण आहेत. एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 4.46 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

 

Web Title :- Pune Corona Update | Comfortable! Discharge of 5521 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, find out other statistics

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

 

हे देखील वाचा

 

Anil Deshmukh | अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे’

 

Gold-Silver Rates Today | खुशखबर ! सोने झाले स्वस्त, चांदी 339 रुपयांनी घसरली; जाणून घ्या आजचा नवीन दर

 

Vidyadhar Anaskar | वैकुंठभाई मेहता संस्थेचे सहकार विद्यापीठात रुपांतर होणार – विद्याधर अनास्कर