Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळं 24 तासात 13 जणांचा मृत्यू तर 181 नवे पॉझिटिव्ह, आज 166 जणांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळं 13 जणांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल 181 नवीन पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, दिवसभरात 166 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आतापर्यंत तब्बल 391 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे.


पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता 8062 वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी तब्बल 5185 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्या 181 रूग्णांपैकी 8 ससून, 130 नायडू तर 43 रूग्ण हे खासगी रूग्णालयातील आहेत. दिवसभरात 13 रूग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. सध्या पुणे शहरात एकुण 2486 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. 204 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 43 जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. आतापर्यंत 391 जणांचे कोरोनामुळं प्राण गेले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. स्थानिक प्रशासन, पोलिस, मनपा आणि जिल्हा प्रशासन 24 तास कार्यरत आहे. विनाकारण नागरिकांनी घराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात येतं आहे. बाहेर पडताना मास्क परिधान करावे, सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं देखील सांगण्यात येत आहे.