Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळं 24 तासात 9 जणांचा मृत्यू तर 182 नवे पॉझिटिव्ह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळं 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल 182 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत.


पुणे शहरात सध्या एकुण 2402 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. आज आढळून आलेल्या 182 रूग्णांपौकी 141 नायडू, 08 ससून आणि 33 खासगी रूग्णालयातील आहेत. त्यांच्यापैकी 183 रूग्ण क्रिटिकल असून त्यापैकी 45 रूग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात 30 जून पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून प्रशासनाने वेळोवेळी आवाहन केले आहे.

– दिवसभरात 182 पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 170 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात 9 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
– 183 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 45 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7447.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2402.
– एकूण मृत्यू -369.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- 4675.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like