Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 446 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update) रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून चढ – उतार पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 215 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 446 रुग्ण बरे झाले आहेत.

 

पुणे शहरात आजपर्यंत 44 लाख 76 हजार 182 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे.
यामध्ये 6 लाख 59 हजार 868 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे.
त्यापैकी 6 लाख 48 हजार 986 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 03 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील दोन तर हद्दीबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 342 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 1 हजार 540 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 95 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Invasive ventilator) वर 12 तर नाॅन इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Non-Invasive ventilator) 9 रुग्ण आहेत. एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 20.90 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | Discharge of 446 corona patients in Pune city in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा