Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा! ‘कोरोना’च्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत मोठी घट, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाची (Pune Corona Update) रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 18 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 65 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
पुणे शहरातील विविध केंद्रावर आज 1 हजार 327 स्वॅब तपासणी (Swab) करण्यात आली आहे. यामध्ये 018 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील एकूण कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या 6 लाख 61 हजार 725 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 52 हजार 258 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 119 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 1 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर आणि नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर एकही रुग्ण नाही. एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 2.52 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
Web Title : Pune Corona Update | Great relief to the people of Pune! A big drop in the number of active patients with corona, find out other statistics
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Holi Precautions | होळी खेळताना ‘या’ 7 चुका करू नका नाहीतर…