Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! व्हेंटिलेटरवर एकही रुग्ण नाही तर ॲाक्सिजनवर केवळ एकच रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिका हद्दीमध्ये कोरोनाची (Pune Corona Update) रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यातच व्हेंटिलेटरवर एकही रुग्ण नसून ऑक्सिजनवर केवळ एकच रुग्ण उपचार घेत असल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 65 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 99 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

पुणे शहरातील विविध केंद्रावर आज 1 हजार 944 स्वॅब तपासणी (Swab) करण्यात आली आहे.
यामध्ये 065 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या 6 लाख 61 हजार 606 इतकी झाली आहे.
यापैकी 6 लाख 51 हजार 684 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.
आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 574 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये एक रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहे. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर आणि नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर एकही रुग्ण नाही. एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 2.43 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | Great relief to the people of Pune Not a single patient on the ventilator but only one patient on oxygen know other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा