Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! गेल्या 24 तासात नव्या ‘कोरोना’ बाधितांची संख्या 500 च्या आत, जाणून घ्या आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जानेवारी महिन्यामध्ये पुणे महापालिका Pune Municipal Corporation (PMC) हद्दीमध्ये कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या झपाट्याने वाढली होती. मात्र मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी होऊन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आज पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला असून शहरातील कोरोना बाधित रुग्णांची (Pune Corona Update) संख्या पाचशेच्या आत आली आहे. गेल्या 24 तासात 424 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 1377 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शहरातील विविध तपासणी केंद्रावर आज 5116 लोकांची स्वॅब तपासणी करण्यात आली. यामध्ये 424 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत 44 लाख 34 हजार 537 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये 6 लाख 56 हजार 955 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 42 हजार 048 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 03 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 02 तर हद्दीबाहेरील 01 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 331 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 5 हजार 576 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
यामध्ये 201 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 29 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 20 रुग्ण आहेत.
एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 10.90 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
Web Title :- Pune Corona Update | Great relief to the people of Pune! The number of new corona victims in the last 24 hours is within 500, know the statistics
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- These Types Of Juices Can Stop Increasing Age | वाढत्या वयाला ब्रेक लावू शकतात ‘हे’ 5 प्रकारचे ज्यूस, नेहमी दिसाल तरुण
- Anna Hazare | अशा सरकारच्या राज्यात जगण्याची इच्छा नाही, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे हताश उद्गार
- Low Blood Sugar | लो ब्लड शुगर सुद्धा आहे शरीरासाठी धोकादायक ! एक्सपर्टकडून जाणून घ्या लक्षणं, कारणं आणि उपचार