Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळं गेल्या 24 तासात 11 जणांचा मृत्यू तर 176 नवे पॉझिटिव्ह, आतापर्यंत 361 बळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. स्थानिक प्रशासन देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24 तास कार्यरत आहे. दरम्यान, पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळं 11 जणांचा बळी गेला आहे तर दिवसभरात 176 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं 361 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासामध्ये 157 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज दिला आहे.


पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 7275 एवढी झाले आहे. त्यापैकी तब्बल 4505 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या शहरात 2399 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. त्यापैकी 176 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर उपचार चालु आहेत. 40 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर उपचार चालु आहेत. पुणे शहरात आतापर्यंत 361 जणांचा कोरोनामुळं बळी गेला आहे.