Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’चा धोका कायमच, 24 तासात 850 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, आज ॲंटिजेन किटद्वारे 264 तपासण्या, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. देशात आणि राज्यात देखील परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनामुक्त होण्याच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे पण नवे पॉझिटिव्ह रूग्ण देखील मोठया संख्येने समोर येत आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासात पुण्यात तब्बल 861 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून तब्बल 15 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे. त्यामुळे आता कोरोनामुळं पुणे शहरात आतापर्यंत एकुण 730 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, आज ॲंटिजेन किटद्वारे 264 तपासण्या करण्यात आल्या आहेत.

पुणे शहरात आता एकुण कोरोनाबाधितांची संख्या 22381 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 13739 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता सध्या पुणे शहरात एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ही 7912 एवढी आहे. आज आढळून आलेल्या 861 रूग्णांमध्ये ससून, नायडू आणि इतर खासगी रूग्णालयातील रूग्णांचा समावेश आहे. दरम्यान, दिवसभरात तब्बल 630 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या अ‍ॅक्टीव्ह असलेल्या 7912 रूग्णांपैकी 368 रूग्ण हे क्रिटिकल आहेत.त्यापैकी 64 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं 730 जणांचा बळी गेला आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका म्हणून प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.