Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळं 24 तासात 6 जणांचा मृत्यू तर 275 नवे पॉझिटिव्ह, आतापर्यंत 375 जणांचा बळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात कोरोनामुळं गेल्या 24 तासात 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 275 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळं आतापर्यंत पुणे शहरात 373 तर शहरालगतच्या 3 असा एकुण 375 जणांचा बळी गेला आहे.


गेल्या 24 तासात आढळून आलेल्या 275 रूग्णांपैकी 8 ससून, 223 नायडू तर 44 रूग्ण खासगी रूग्णालयातील आहेत. पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 7722 वर जाऊन पोहचला आहे. दरम्यान, आतापर्यंत 4934 रूग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज दिवसभरात 259 रूग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या 2413 असून त्यापैकी 195 रूग्ण हे क्रिटिकल आहेत. त्यापैकी 49 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. केंद्र सरकारनं 30 जून पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं, सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं प्रशासनानं वेळावेळी आवाहन केलं आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत असल्याचं पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.