Coronavirus : पुणे विभागात 23159 ‘कोरोना’बाधित, आतापर्यंत 13917 उपचारानंतर झाले बरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे विभागातील 13 हजार 917 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 23 हजार 159 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 8 हजार 283 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 959 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 463 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.09 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.14 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 18 हजार 840 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 10 हजार 889 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 294 आहे. कोरोनाबाधित एकूण 657 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 373 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या
रुग्णांचे प्रमाण 57.80 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.49 टक्के इतके आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 110 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 935, सातारा जिल्ह्यात 24, सोलापूर जिल्ह्यात 131, सांगली जिल्ह्यात 7 तर कोल्हापूर जिल्ह्यात 13 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत 888 रुग्ण असून 689 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 158 आहे. कोरोनाबाधित एकूण 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 340 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 425 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 673 आहे. कोरोना बाधित एकूण 242 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत 313 रुग्ण असून 204 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 99 आहे. कोरोना बाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 778 कोरोना बाधीत रुग्ण असून 710 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 59 आहे. कोरोना बाधित एकूण 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 56 हजार 476 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 55 हजार 40 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 436 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 31 हजार 554 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 23 हजार 159 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

(टिप – दि. 26 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)