Pune Corona Updates | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 5705 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Coronavirus) तब्बल 5 हजार 705 नवे रूग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 2 हजार 338 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून ते कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रूग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. गेल्या 24 तासात एकुण 8 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुणे शहरातील दोघांचा तर पुण्याबाहेरील 6 जणांचा समावेश आहे. (Pune Corona Updates)

 

एकुण सक्रिय रूग्णांपैकी 204 रूग्णांना ऑक्सिजनवर उपचार दिले जात आहेत. (इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर -22 आणि नॉन इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर -22). पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 54 हजार 174 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 5 लाख 13 हजार 131 जण कोरोनामुक्त झालेले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 31 हजार 907 रूग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 136 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 19 हजार 174 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 5 हजार 705 जणांचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला आहे. (Pune Corona Updates)

 

कोरोनाच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. देशात आणि राज्यातील रूग्णांची संख्या देखील वाढत आहे.
अशा परिस्थिती नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सुरक्षित अंतर बाळगावे असे आवाहन प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात आले आहे.
विना मास्क प्रवास करणार्‍यांवर प्रशासनाकडून तसेच पुणे शहर पोलिस (Pune Police) दलाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
दंडात्मक कारवाई सुरू असलीतरी काहीजण विनामास्क बाहेर फिरताना दिसून येत आहेत.

 

Web Title : Pune Corona Updates | 5705 new corona patients in Pune in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kiran Mane | प्रसिद्ध अभिनेता किरण माने आता शरद पवार यांची भेट घेणार

 

Taarak Mehta Ka Ooltah Chashma | तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये ‘या’ बोल्ड अभिनेत्रीची एंट्री, सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले फोटो

 

BSF Recruitment 2022 | 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ! BSF मध्ये तब्बल 2788 जागांसाठी बंपर भरती; जाणून घ्या