Pune Corona Updates | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6299 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – कोरोना व्हायरसचे रूग्ण अद्यापही मोठया प्रमाणावर आढळून येत आहेत. आज रविवार असताना देखील पुणे शहरात (Pune Corona Updates) गेल्या 24 तासात तब्बल 6 हजार 299 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता पुणे शहरातील सक्रिय रूग्णांची संख्या आता 46 हजार 863 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान, आज दिवसभरात तब्बल 5 हजार 375 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Pune Corona Updates)

 

पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळं 11 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये पुण्याबाहेरील 6 जणांचा समावेश आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 9 हजार 192 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 6 लाख 6 हजार 379 वर गेली आहे. त्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 5 लाख 50 हजार 324 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात 17 हजार 825 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते त्यापैकी 6 हजार 299 जणांचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आहे. पुणे शहरात सक्रिय असलेल्या एकुण रूग्णांपैकी 322 रूग्ण हे ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. 50 रूग्ण हे इनव्हेसिव्ह व्हेंटिलेटरवर तर 28 रूग्ण हे नॉन इनव्हेसिव्ह व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. (Pune Corona Updates)

 

नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे. गर्दी करू नये. सामाजिक अंतर बाळगावे अशा सूचना प्रशासनाकडून वेळावेळी देण्यात येत आहेत. दरम्यान, विनामास्क (Without Mask) फिरणार्‍यांवर पुणे महापालिका (Pune Corporation) आणि पुणे पोलिसांकडून (Pune Police) दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे.

 

Web Title :- Pune Corona Updates | 6299 new corona patients in Pune in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP | राष्ट्रवादीकडून पुण्यात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; 204 युवक-युवतींना मिळाली रोजगाराची संधी

 

Pension साठी LIC कार्यालयात जाऊन जमा करावे लागणार नाही Digital Life Certificate, असे होईल काम

 

Vitamin C Deficiency | सावधान ! ‘या’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे केस, दात आणि त्वचेला धोका; दृष्टी होते कमी