Pune Corona Updates | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 8 हजार 246 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

0
88
Pune Corona Update In the last 24 hours 2197 patients in Pune city are corona free find out other statistics
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corona Updates | देशासह राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. प्रशासनाकडून त्यावर उपाययोजना करण्यात येत असून लसीकरणाचा वेग (Corona Vaccination Speed) देखील वाढवण्यात आला आहे. दरम्यान, पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 8 हजार 246 नवे रूग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात कोरोनामृत्यू 9 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 7 हजार 368 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Pune Corona Updates)

पुण्यातील एकुण कोरोनाबाधितांच्या संख्येचा आकडा आता 6 लाख 80 वर जाऊन पोहचला आहे. त्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 5 लाख 44 हजार 949 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे एकुण 45 हजार 950 रूग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी 301 रूग्णांना ऑक्सिजन देण्यात येत आहे. 48 जण इनव्हॅसिव्ह व्हेंटिलेटरवर आहेत तर 24 जण नॉन इनव्हॅसिव्ह व्हेंटिलेटरवर आहेत. (Pune Corona Updates)

 

आज दिवसभरात 19 हजार 34 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी तब्बल 8 हजार 246 जणांचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे चिंतेचे कारण वाढले आहे. एकुण सक्रिय असलेल्या कोराना रूग्णांच्या केवळ 3.17 टक्के रूग्ण हे रूग्णालयात उपचार घेत आहेत तर इतर सर्वजण घरीच उपचार घेत आहेत. कोरोनामुळे पुणे शहरात आतापर्यंत 9 हजार 181 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :- Pune Corona Updates | 8 thousand 246 new patients of corona in last 24 hours in Pune, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Squid Game 2 | ‘स्क्विड गेम’ या लोकप्रिय कोरियन मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, नेटफ्लिक्सच्या सीईओने केली घोषणा

 

Celebs Who Opted For Surrogacy | प्रियांका चोप्रा-निक जोनासपासून शिल्पा शेट्टी-राज कुंद्रापर्यंत, ‘हे’ सेलिब्रिटी सरोगसीद्वारे बनले पालक

 

Pavitra Rishta 2 Promo | मानव आणि अर्चना मध्ये आला राजवीर, विवेक दहियाची एन्ट्रीमुळं उडाली खळबळ

 

Palak Tiwari | पलक तिवारी झाली सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमसोबत स्पाॅट, दोघेही डेटवर गेल्याची शंका; कॅमेरा बघताच पलकने लपवलं तोंड

 

Pune Crime | पिंपरी-चिंचवड परिसरातील संतापजनक घटना ! टीव्हीचा आवाज वाढवून 12 वर्षीय मुलीवर अनैसर्गिक अत्याचार; नराधम जेरबंद

 

Ajit Pawar | ‘जलतरण तलाव आणि खेळाची मैदाने सुरू करा’ – अजित पवार