पुण्यात तरुणानं जी चूक केली तिच 30 वर्षीय महिलेनं केली, 8 तासात मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दीड लाखांच्या वर गेली आहे. तर देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा रुग्ण आढळून आले असून राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 57 हजाराच्या जवळ पोहचली आहे. कोरोना विषाणूच्या संकटात स्वत:ची काळजी घेतली नाही तर जीवावर बेतू शकतं. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने 21 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच तशाच चुकीमुळे आणखी एका 30 वर्षिय महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. लक्षण दिसत असताना उपचारासाठी उशीर केल्याने पुण्यातील या महिलेचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातील या महिलेला 22 मे रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तसेच ताप आणि खोकला अशी कोरोनाची लक्षणं दिसू लागली. मात्र, या महिलेनं तीन दिवस त्याकडे दुर्लक्ष करत उपचार घेणं टाळलं. अखेर 25 मे रोजी त्रास वाढल्याने या महिलेने रुग्णालयात धाव घेतली. मात्र, उपचार सुरु झाल्यानंतर अवघ्या 8 तासात या महिलेचा मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त एका मराठी न्यूज चॅनलने दिले आहे.

दरम्यान, पुण्यातील गुलटेकडी या परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला मागील काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण दिसत होती. मात्र, त्याने आपल्याला काही होणार नाही, असा अतित्महविश्वास की कोरोनाबद्दलची भीती हे सांगता येत नाही. मात्र, या तरुणाने होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करत उपचार घेण्याचे टाळलं. मात्र, 22 मे रोजी जास्त त्रास होऊ लागल्याने त्याने रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याने तरुणाला 22 मे रोजी रात्री साडेसातच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच त्याच मृत्यू झाला. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल 23 मे रोजी पॉझिटिव्ह आला.