Pune Corona Updates | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 8200 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Updates) रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Updates) 3 हजार 374 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 8 हजार 200 रुग्ण बरे झाले आहेत.

 

 

शहरात आजपर्यंत 43 लाख 04 हजार 610 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये 6 लाख 28 हजार 058 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Updates) आढळून आले आहे. त्यापैकी 5 लाख 82 हजार 497 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 07 तर हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 221 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 36 हजार 340 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 358 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 54 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 34 रुग्ण आहेत. एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 3.73 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Corona Updates | Comfortable! 8200 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

 

हे देखील वाचा

Nora Fatehi Viral Photo | नोरा फतेहीच्या ‘या’ अनोख्या फोटोनं बोल्ड इमेजला दिली टक्कर, फोटो पाहून चाहते झाले ‘घायाळ’

 

Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘हे सरकार ‘बेवड्यांना’ समर्पित’

 

Rashmika Mandanna Oops Moment | भर कार्यक्रमात रश्मिकानं पायवर करताच दिसायला नको होतं ते दिसलं अन्…