Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3377 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीत काल (रविवार) 6299 रुग्ण आढळून आले होते. यामध्ये आज घट झाली आहे. आज (सोमवार) कोरोनाच्या नवीन (Pune Corona Updates) 3 हजार 377 रुग्णांची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून शहरात दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. रुग्ण संख्या वाढत असताना (Pune Corona Updates) मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या वाढली आहे.

 

आज पुणे शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने दिलासा मिळाला आहे. पुणे शहरात आजपर्यंत 6 लाख 09 हजार 756 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Updates) आढळून आले आहे. आज शहरात 3931 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत 5 लाख 54 हजार 255 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 07 तर शहराबाहेरील 05 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 199 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 46 हजार 302 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 328 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
49 रुग्ण इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर तर 27 नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 12,543 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Corona Updates | Diagnosis of 3377 new patients of Corona in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes | कोण-कोणते ड्रायफ्रूट वाढवू शकतात ब्लड शुगर? जाणून घ्या डायबिटीजच्या रूग्णांनी काय खावे

 

Madhav Rasayan | विषाणू संसर्गजन्य आजारावर ‘माधव रसायन’ची प्रभावी मात्रा; क्लिनिकल ट्रायलमध्ये उपयुक्तता सिद्ध; कोल्हापूर येथील श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटरचे संशोधन

 

Lata Mangeshkar Health Update | गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या प्रकृतीबाबत मोठी हेल्थ अपडेट; पुन्हा प्रार्थनेची विनंती…