Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 4866 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीत आज (मंगळवार) कोरोनाच्या नवीन (Pune Corona Updates) 4 हजार 866 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच जुन्या सॅम्पल्समधील 1454 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून शहरात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण संख्या वाढत असताना (Pune Corona Updates) मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या वाढली आहे.

 

शहरात आजपर्यंत 5 लाख 69 हजार 828 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Updates) आढळून आले आहे. आज शहरात 3381 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आजपर्यंत 5 लाख 22 हजार 669 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर शहराबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 152 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 38 हजार 007 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 225 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
30 रुग्ण इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर तर 27 नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 14,998 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Corona Updates | Diagnosis of 4866 new patients of ‘Corona’ in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचा पटोलेंवर निशाणा; म्हणाल्या – ‘सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले’

 

Vinod Kambli-Sachin Tendulkar | माजी क्रिकेटपट्टू विनोद कांबळीनं ठोकलं अर्धशतक..! सचिनने ‘खास’ फोटो शेअर करत म्हणाला…

 

Online Portal for Pension Complaint | पेन्शनर्ससाठी सरकारने बनवले पोर्टल ! आता पेन्शनसंबंधी तक्रारी तात्काळ होतील दूर, जाणून घ्या पद्धत