Pune Corona Updates | गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 5375 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे आणि मुंबई (Mumbai) शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona Updates) अक्षरश: हाहा:कार सुरु आहे. परंतु मुंबईतील रुग्णांची संख्या कमी होत आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहरात 5 हजाराच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Updates) 5375 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3090 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. रुग्ण वाढत असताना ओमायक्रॉन (Omicron) बाधित रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे.

शहरात आजपर्यंत 41 लाख 06 हजार 614 प्रयोशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये 5 लाख 59 हजार 549 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Updates) आढळून आले आहे. त्यापैकी 5 लाख 16 हजार 221 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 5 तर हद्दीबाहेरील 3 रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 141 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 34 हजार 187 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 217 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 22 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 24 रुग्ण आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 19 हजार 119 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Pune Corona Updates | Diagnosis of 5375 patients of Corona in last 24 hours, find out other statistics

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Horoscope (Rashifal) | 17 जानेवारीला ‘या’ 5 राशीचे लोक साजरा करतील जल्लोष, चमकणार भाग्य; वाचा मेषपासून मीन राशीपर्यंतची स्थिती

 

Pune Crime | मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील हत्याकांडातील आरोपीची निर्दोष मुक्तता

 

PF Balance Check Process | 011-22901406 हा नंबर खुपच उपयोगाचा, किती पैसे तुम्ही जमवले? एका मिस्ड कॉलमध्ये मराठीमध्ये संपूर्ण माहिती, जाणून घ्या प्रोसेस