Pune Corona Updates | अत्यंत चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात 4000 पेक्षा जास्त नवे कोरोना रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोना (Pune Corona Updates) संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. आज पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. आज शहरामध्ये चार हजाराच्या वर रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच ओमिक्रॉन (Omicron) बाधित रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Updates) 4029 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 688 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 26 हजार 035 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहे. त्यापैकी 5 लाख 02 हजार 018 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील एका तर शहराबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 127 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Pune Corona Updates)

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 14 हजार 890 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 134 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. तर 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 18012 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 39 लाख 77 हजार 381 तपासणी करण्यात आल्या आहेत.

 

 

Web Title :- Pune Corona Updates | Extremely worrying! More than 4000 new corona patients in Pune in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nude Photography | ‘न्यूड फोटोग्राफी’ ही कला नाही का? पुण्यातील ‘बालगंर्धव’मध्ये प्रदर्शन भरवल्यावर तरुणाला आंदोलनाची धमकी

 

Rajesh Tope | राज्यात लॉकडाऊन होणार नाही? राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती

 

Amruta Dhongade | ‘मिसेस मुख्यमंत्री’ची जोडी मोठ्या पडद्यावर करणार ‘दिशाभूल’

 

Coronavirus Restrictions | सगळं सुरु मग ब्युटी पार्लर आणि जीम का बंद? वादानंतर सरकारचा मोठा निर्णय; ‘हे’ आहेत सुधारित निर्बंध

 

Railway Station Development Fee | नववर्षात रेल्वे प्रवाशांना मोठा झटका ! एअरपोर्ट प्रमाणे भरावा लागेल स्टेशन युजर चार्ज