Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात 6333 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीत मागील काही दिवसांपासून 5 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या (Pune Corona Updates) 5521 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 44 हजाराच्या वर गेली आहे.

 

शहरात आजपर्यंत 6 लाख 20 हजार 548 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Updates) आढळून आले आहे.
आज शहरात 6333 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आजपर्यंत 5 लाख 66 हजार 887 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 03 तर शहराबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 209 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 44 हजार 452 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 342 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
46 रुग्ण इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर तर 35 नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 18,082 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Corona Updates | In the last 24 hours, 6333 patients in Pune city are corona free, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांचा किमान मूळ पगार वाढून होणार 26000! वेतन वाढवण्याबाबत आली नवी माहिती

 

Shilpa Shetty Viral Kiss Video | भर कार्यक्रमामध्ये शिल्पा शेट्टीला केलं होतं KISS, ज्यामुळे तिला तब्बल 15 वर्ष न्यायालयानं ठेवलं जखडून; पाहा व्हायरल व्हिडिओ

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना ‘या’ आठवड्यात मिळू शकते चांगली बातमी, 18 महिन्याच्या थकीत डीए एरियरवर होणार निर्णय