Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2000 पेक्षा जास्त नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Updates) रुग्ण संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Updates) 2056 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3263 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

पुणे शहरात आजपर्यंत 43 लाख 37 हजार 037 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे.
यामध्ये 6 लाख 39 हजार 420 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Updates) आढळून आले आहे.
त्यापैकी 6 लाख 258 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 09 तर हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 245 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 29 हजार 917 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 336 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 51 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 29 रुग्ण आहेत.
एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 4.14 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Updates | More than 2000 new patients of Corona in Pune city in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा