Pune Corona Updates | पुण्यातील कोरोना रुग्णांत एका महिन्यात 10 पटीने वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corona Updates | मागील काही दिवसांपासून राज्यासह पुण्यातही कोरोना रुग्णांच्या (Pune Corona Updates) संख्येत अधिक वाढ होत आहे. मागील तीस दिवसात पुणे शहरात 10 पटीने कोरोनाच्या रूग्णांत वाढ झाली आहे. पुण्यातील (Pune News) बुधवारी एकूण अँक्टीव रूग्णांची संख्या सात हजार 320 इतकी झाली आहे. हाच कोरोनाचा आकडा महिनाभरापूर्वी 742 इतकी होती. दिवसभरातील नव्या कोरोना रुग्णांत देखील 47 टक्क्यांनी झालीय. अशी माहिती दैनंदिन कोरोना रुग्णांच्या अहवालामधून समोर आली आहे.

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्या वाढत असली तरी पुणेकरांनी घाबरून जाऊ नये. आवश्‍यक खबरदारी घ्यावी. यासाठी मास्कचा नियमित वापर करणे, सतत हात धुणे, गर्दीत जाणे टाळावे आणि लक्षणे दिसताच जवळच्या दवाखान्यात त्वरित जावे, याबाबत आवाहन देखील आरोग्य विभागाकडून (Department of Health) देण्यात आलं आहे. (Pune Corona Updates)

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या महिनाभरात 12 हजार 810 इतकी झाली आहे.
तर, 6 डिसेंबरला पुणे शहरात एका दिवसामध्ये फक्त 38 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते.
त्यानंतर (बुधवारी) दिवसातील रुग्ण संख्या एक हजार 805 वर गेली आहे.
या दरम्यान, महिनाभरातील दिवसातील नवीन कोरोना रुग्णांचा फरक एक हजार 767 इतका झाला आहे.

 

Web Title :-  Pune Corona Updates | Pune corona patients increased ten times in 30 days

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | RTI कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला मोक्काच्या गुन्ह्यात 11 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी, चतुःश्रृंगी पोलिसांनी केली होती अटक

 

Tax Saving | 10 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 1 रुपयाचाही भरावा लागणार नाही टॅक्स, जाणून घ्या काय करावे

 

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर