Pune Corona Updates | पुणेकरांची चिंता वाढली ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5500 पेक्षा अधिक नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona Updates) संसर्ग होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आज पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. बुधवारी (दि.12) पुणे शहरात 4857 रुग्ण आढळून आले होते. तर आज यामध्ये तब्बल 714 रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Updates) 5571 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2335 रुग्णांनी कोरोना मुक्त झाले आहेत.

शहरात आजपर्यंत 40 लाख 48 हजार 172 प्रयोशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 5 लाख 42 हजार 989 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Updates) आढळून आले आहे. त्यापैकी 5 लाख 08 हजार 119 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील एक तर हद्दीबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 133 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात मृत्यूचे प्रमाण कमी असल्याने थोडा दिसाला मिळत आहे.

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 25 हजार 737 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 182 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 19 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 26 रुग्ण आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 19 हजार 868 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Pune Corona Updates | Pune residents worried! More than 5500 new patients diagnosed with Corona in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे दुसऱ्यांदा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, मनपा आयुक्त विक्रम कुमारांसोबत केला होता पाहणी दौरा

 

Where To Invest | तरुण गुंतवणूकदारांची सर्वात मोठी समस्या: पैसे तर वाचवले, पण गुंतवणूक कुठे करावी?

 

Coronavirus in Maharashtra | मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांत कोरोनाचा कहर ! औरंगाबाद, लातूर, नांदेडमध्ये रुग्णसंख्येची आकडेवारी वाढली