Pune Corona Updates | चिंताजनक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 6441 रुग्णांचे निदान, मृतांची संख्या वाढली; जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona Updates) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Updates) तब्बल 6441 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4857 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. रुग्ण वाढत असताना ओमायक्रॉन (Omycron) बाधित रुग्ण आढळून येत आहेत. तसेच मृतांची संख्या देखील वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

 

पुणे शहरात आजपर्यंत 41 लाख 59 हजार 425 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये 5 लाख 76 हजार 269 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहे. त्यापैकी 5 लाख 27 हजार 526 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 09 तर हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 161 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Pune Corona Updates)

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 39 हजार 582 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 258 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 39 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 28 रुग्ण आहेत. एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 3.57 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 22 हजार 183 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Corona Updates | Worrying! In the last 24 hours in Pune city, 6441 patients of ‘Corona’ were diagnosed and the death toll increased; Learn other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Latur Crime | धक्कादायक ! भावजयीशी फोनवर बोलतो म्हणून तरुणाला जिवंत जाळलं; महिन्यानंतर उकललं गूढ

 

Varun Dhawan | वरुण धवनच्या ड्रायव्हर ‘मनोज’ यांच हृदयविकाराच्या झटक्याने निधन, अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय

 

International Roaming SIM Card | TRAI च्या शिफारशींनंतर सरकारचा मोठा निर्णय ! सिम कार्डच्या नियमात बदल; जाणून घ्या