Pune Corona Updates | चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1800 पेक्षा जास्त नवे रूग्ण, जाणून घ्या आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corona Updates | कोरोना व्हायरसचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. पुणे शहरातील परिस्थिती देखील चिंताजनक आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1 हजार 805 नवे रूग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. दरम्यान, दिवसभरात 131 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Pune Corona Updates)

 

पुण्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या आता 5 लाख 14 हजार 494 वर जाऊन पोहचली आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 5 हजार 464 रूग्ण हे सक्रिय आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 73 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कोरोनामुळं पुण्यात आतापर्यंत 9 हजार 119 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तब्बल 4 लाख 99 हजार 911 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात शहरातील 13 हजार 443 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यामध्ये 1 हजार 805 जणांचा कोरोनाचा अहवाल हा सकारात्मक आला आहे. (Pune Corona Updates)

 

कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कालच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील इयत्ता 1 ते 8 वी पर्यंतच्या शाळा बंद (Pune School) राहतील असे जाहीर केले. त्यांचे ऑनलाइन वर्ग सुरू राहणार आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून पुणेकरांना काळजी घेण्याचे आवाहन वेळाेवेळी करण्यात येत आहे.

 

Web Title :- Pune Corona Updates | Worrying! More than 1800 new corona patients in Pune in last 24 hours, find out the statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा