Pune Corona Updates | चिंताजनक ! पुणे शहरात कोरोनाची साथ आल्यापासूनची एका दिवसातील ‘उच्चांकी’, गेल्या 24 तासात 7264 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीत आज कोरोनाच्या नवीन (Pune Corona Updates) रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. ही आजपर्यंत सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे पुणे शहरात कोरोनाची तीसरी लाट आल्याचे बोलले जात आहे. आज दिवसभरात 7 हजार 264 रुग्णांची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून शहरात दिवसागणिक 6 हजारांच्यावर कोरोना रुग्णांची (Pune Corona Updates) संख्या वाढत आहे. कोरोनाची साथ आल्यापासून आज समोर आलेली आकडेवारी ही एका दिवसातील सर्वात जास्त आहे. यापूर्वी 8 एप्रिल 2021 मध्ये 7 हजार 10 आढळले होते, अशी माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे (Dr. Sanjeev Wavre) यांनी दिली.

 

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 83 हजार 533 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहे. आज शहरात 4575 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आजपर्यंत 5 लाख 32 हजार 101 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 7 तर शहराबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 168 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Pune Corona Updates)

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 42 हजार 264 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 282 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
41 रुग्ण इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर तर 33 नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर आहेत.
शहरातील एकूण सक्रीय रुग्णांच्या तुलनेत हॉस्पिटलमध्ये 3.40 टक्के रुग्ण उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 20,342 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 41 लाख 79 हजार 767 तपासणी करण्यात आल्या आहेत.

 

Web Title :- Pune Corona Updates | Worrying! One day ‘high’ in Pune city since the corona outbreak, 7264 new patients in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ami Organics | अलिकडेच लिस्ट झालेला हा स्पेशियलिटी केमिकल स्टॉक घेऊ शकतो मोठी झेप, जाणून घ्या काय आहे टार्गेट आणि स्टॉप लॉस

 

Pune Crime | लग्नापूर्वी कौमार्यभंगाचा ठपका ठेवत विवाहितेचा छळ, पुण्याच्या हडपसरमध्ये सॉफ्टवेअर इंजीनियर पतीसह सासू-सासऱ्यांवर FIR

 

Pune Crime | पिंपरी चिंचवड पोलिसांचा परराज्यातील अट्टल दरोडेखोरांसोबत ‘थरार’, 6 आरोपीं ताब्यात; एक पोलीस जखमी