Pune : पोलिओसारखी कोरोनाची लस घरोघरी द्यावी : शिवसेनेच्या उपसंघटिका नीता भोसले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मागिल महिन्यापासून कोरोनाचा ज्वर वाढत आहे. हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिक सैरभर झाले आहेत. त्यातच कोविड लस घेण्यासाठी दररोज लसीकरण केंद्रावर भल्या पहाटे नागरिक रांग लावत आहेत. मात्र, लसीकरण केंद्रावर फक्त 100 नागरिकांनाच लस दिली जात असल्याने अनेकांना लस मिळविण्यासाठी दररोज वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला घरोघरी लस देण्याचे नियोजन करावे, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांना ई-मेलद्वारे केली मागणी हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना उपसंघटिका नीता भोसले यांनी केली आहे.

भोसले म्हणाल्या की, मागिल वर्षभरापासून कोरोना विषाणूने देशभर थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांना उपचारासाठी रुग्णालयांमध्ये जागाच शिल्लक नाही, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे कोविड लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. मात्र, लसीकरण केंद्रावर अवघ्या 100 नागरिकांनाच लस दिली जात आहे. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने नागरिकांना लस मिळविण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. कोरानाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. ही परिस्थिती भयावह आहे, त्यामुळे पोलिओचा डोस घरोघरी जाऊन दिला जातो, त्याप्रमाणे कोविड लससुद्धा घरोघरी देण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता वाटत आहे. तसेच, केंद्र आणि राज्य सरकारने रेमडिसिव्हर इंजेक्शनची उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी निवेदनामध्ये स्पष्ट केले आहे.