Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 351 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये (Pune City) कोरोना बाधित रुग्णांच्या (Corona-infected patients) संख्येत वेगाने घट होत आहे. रुग्ण कमी होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) वाढले आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा (New patients daily in the city) बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. पुणे शहरामध्ये (Pune Corona) गेल्या 24 तासात 246 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 351 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

पुणे शहरात (Pune Corona) आजपर्यंत 4 लाख 74 हजार 545 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 63 हजार 280 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 10 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 11 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8492 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Pune Municipal Corporation। महापालिकेकडून निलेश राणे आणि संजय काकडे यांना नोटीस; थकवली तब्बल 83 लाखांची पाणीपट्टी

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4748 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत पुण्यामध्ये 25 लाख 86 हजार 962 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत.
शहरामध्ये सध्या 483 रुग्ण गंभीर आहेत. तर 736 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत,
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Department of Health) दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 97.20 रुग्ण
पुणे जिल्ह्यातील (Pune district) कोरोना बाधीत एकूण 10 लाख 32 हजार 917 रुग्णांपैकी 10 लाख 3 हजार 992 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्ण Active patient 11 हजार 563 आहे.
कोरोनाबाधित एकूण 17 हजार 362 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण (Recovery rate) 97.20 टक्के आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : pune corona virus news updates today

हे देखील वाचा

Pune Traffic | सारसबाग येथील वाहन पार्किंगमध्ये बदल

Ayodhya Shri Ram Janmabhoomi land scam । राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा ? अजित पवार म्हणाले..

Learning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल परवाना