Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187 नवीन रुग्ण, 319 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Corona in Pune city) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या तीन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त (Recover) होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 187 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 319 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 74 हजार 299 इतके कोरोना (Corona) बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 62 हजार 929 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 07 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 06 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8482 जणांचा कोरोनामुळे  मृत्यू झाला आहे.

पुण्यात 2888 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 2888 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 502 रुग्ण गंभीर आहेत. तर 799 रुग्ण ऑक्सिजनवर (Oxygen) उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 3441 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आज पर्यंत शहरात 25 लाख 82 हजार 214 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory test) करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

पुणे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.09%
पुणे जिल्ह्यातील (Pune District) कोरोना बाधीत एकूण 10 लाख 32 हजार 91 रुग्णांपैकी 10 लाख 2 हजार 62 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 12 हजार 682 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 347 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.09 टक्के आहे.

Wab Title :- pune corona virus news updates today | policenama

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

फुफ्फुसांची होतेय समस्या ! कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता

मुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’ गाडी, असे केले रेस्क्यू; पहा व्हिडीओ

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा केवळ 95 रुपये आणि मिळतील 14 लाख, जाणून घ्या कसे?

इस्त्रायलमध्ये नवीन सत्ता ! 12 वर्षानंतर बेंजामिन नेतन्याहू यांना निरोप, नफ्ताली बेनेट बनले नवीन पंतप्रधान

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा