Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 459 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये (Pune City) कोरोना बाधित(Pune Corona) रुग्णांच्या (Corona-infected patients) संख्येत वेगाने घट होत आहे. रुग्ण कमी होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) वाढले आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. पुणे शहरामध्ये (Pune Corona) गेल्या 24 तासात 331 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 459 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 73 हजार 870 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 62 हजार 222 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 10 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 10 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8466 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Lockdown मध्ये पत्नीच्या तुलनेत पतीवर जास्त अत्याचार, पुणे पोलिसांच्या ‘ट्रस्ट सेल’चा धक्कादायक खुलासा

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5829 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत पुण्यामध्ये 25 लाख 73 हजार 241 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत.
शहरामध्ये सध्या 517 रुग्ण गंभीर आहेत. तर 862 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत,
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Department of Health) दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 96.97 रुग्ण
पुणे जिल्ह्यातील (Pune District) कोरोना बाधीत एकूण 10 लाख 29 हजार 442 रुग्णांपैकी 9 लाख 98 हजार 215 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्ण 13 हजार 926 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 301 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.97 टक्के आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :  pune corona virus news updates today

हे देखील वाचा

12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

फेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला 44 लाख रुपयांना फसवलं; कोरोना व इतर भूलथापा मारल्या

सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा