पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Pune Corona |कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये नव्या कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत होते. मात्र, गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे (Pune Corona) तब्बल 432 नवे रूग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 271 रूग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज दिवसभरात पुण्यातील 14 आणि पुण्याबाहेरील 8 अशा एकुण 22 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. पुण्यातील एकुण कोरोनाबाधितांची (Pune Corona) संख्या 4 लाख 80 हजार 582 वर गेली आहे. त्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 4 लाख 69 हजार 83 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. पुण्यात सध्या 2 हजार 871 रूग्ण हे अॅक्टीव्ह आहेत. एकुण सक्रिय रूग्णांपैकी 252 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पुण्यात आतापर्यंत तब्बल 8 हजार 628 रूग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 7 हजार 26 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 432 जणांचे कोरोनाचे अहवाल सकारात्मक आले आहेत.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update
Web Title : Pune Corona | Worrying ! Corona’s 432 new positives in Pune in last 24 hours
हे देखील वाचा
दिग्गज अभिनेता दिलीपकुमार यांचं निधन, मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास
नारायण राणे, प्रीतम मुंडे, शिंदेंसह संभाव्य मंत्री पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल
Modi Cabinet Expansion | मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारापुर्वीच मोठी खळबळ ! केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचा राजीनामा