Pune Corona | चिंताजनक ! पुण्यात ‘कोरोना’ लसीकरणानंतरही आतापर्यंत 12000 ‘पॉझीटीव्ह’ तर 59 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात लसीकरणानंतरही (Vaccination) नागरिकांना कोरोनाची लागण (Pune Corona) झाल्याचे समोर आले आहे. पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतरही १२ हजारांहून अधिक नागरिकांना कोरोना (Pune Corona) झाला असून आतापर्यंत ५९ जणांचा मृत्यू झाल्याने लसीकरणानंतरही नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने (PMC Health Department) करण्यात आले आहे.

 

पुणे शहरात मागीलवर्षी ९ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आतापर्यंत ५ लाख ५ हजार ७०५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून ९ हजार ९० जणांचा मृत्यूदेखिल झाला आहे. यावर्षी १६ जानेवारीपासून पुण्यासह संपुर्ण देशभरात लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची आणि मृतांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये आतापर्यंत ५१ लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी ३१ लाख ९८ हजार नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून १९ लाख नागरिकांनी दोन्हीही डोस घेतले आहेत.

 

 

लसीकरण झाल्यानंतर कोरोना (Pune Corona) होणारच नाही असा दावा करण्यात आलेला नाही. मात्र, कोरोना झाल्यानंतर त्याची तीव्रता कमी होईल, असे लसीकरणाच्या सुरूवातीलाच स्पष्ट करण्यात आले आहे. मागील दहा महिन्यात प्रामुख्याने लसीकरणाचा वेग वाढल्यानंतर तसे परिणाम दिसूनही येत आहेत. पुण्यातही पहिला डोस घेतलेल ५ हजार ६२१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ३३ जणांचा मृत्यू देखिल झाला आहे. तसेच दोन्ही डोस घेतलेले ६ हजार ६८१ जणांनाही कोरोना झाला असून यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

लसीकरणानंतरही (Corona Vaccination) कोरोनाची लागण होत असून अन्य अजारांची तीव्रता असलेल्यांचा प्रसंगी मृत्यूदेखिल होत आहे,
हे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. त्यामुळे अनलॉकनंतर सर्व व्यवहार सुरळीत होत
असताना नागरिकांनी कोरोनाची (Pune Corona) लागण होउ नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे,
गर्दीपासून दूर राहाणे, सर्दी व खोकल्यासारखी लक्षणे दिसू लागल्यास त्वरीत तपासणी करून घ्यावी,
तसेच आरोग्याशी संबधित लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Corona | Worrying ! Even after corona vaccination in Pune, 12000 peoples become corona positive and 59 people have died so far – pune corporation health department PMC health

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा