Pune Corona | चिंताजनक ! शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 11 हजारांहून अधिक, गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 2471 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडत आहे. काल पुण्यात 2757 रुग्ण आढळून आले होते. आज यामध्ये थोडीशी घट झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona) 2471 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 711 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. रुग्ण वाढत असल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजाराच्या वर गेली आहे.

 

शहरात आजपर्यंत 5 लाख 22 हजार 006 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहे. त्यापैकी 5 लाख 01 हजार 330 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 3 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये शहरातील 2 तर शहराबाहेरील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 126 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरामध्ये सध्या 11 हजार 550 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient) आहेत.
यामध्ये 120 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत असून 19 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 19 हजार 186 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 39 लाख 59 हजार 369 तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (PMC Health Department)

 

Web Title :- Pune Corona | Worrying! More than 11,000 active patients in the city, 2471 diagnoses of corona in the last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

DGP Sanjay Pandey | पोलीस महासंचालक संजय पांडे यांना हटवण्याबाबत मुंबई हाय कोर्टात याचिका

Omicron Covid Variant | ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे किती दिवसांनी जाणवते? WHO ने सांगितले – ‘अशी करा आपली इम्युनिटी बूस्ट’

EPFO | 22.55 कोटी खातेधारकांच्या खात्यात पाठवले व्याजाचे पैसे, ताबडतोब असे तपासा तुम्हाला मिळाले किंवा नाही ?