पुण्यात महिलांपेक्षा पुरूषांच्या कोरोना बळीचे प्रमाण जास्त, वर्षाभरातील मृत्यूमध्ये 67 % पुरूष

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या महाभयंकर विषाणूने लोकांची परिस्थिती गंभीर करून टाकली आहे. तर अनेक कोरोना रुग्णाचा जीव जातो आहे. यंदाच्या लाटेत मृत्यूची संख्या देखील अधिक आहे. तर संशोधनामध्ये कोरोना विषाणूचा अधिक धोका हा पुरुषांना असल्याचं समोर आलं आहे. यानुसार पुण्यामधून एक धोकादायक संख्या पुढं आलीय. पुण्यामध्ये महिलांपेक्षा पुरुषाचे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. सुमारे मागील वर्षभरात ६७ टक्के पुरुष मृत्यूमुखी पडले आहेत.

महाराष्ट्र राज्यात प्रथम पुण्यातच कोरोना बाधित रुग्ण सापडला होता. तसेच, एप्रिलमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला होता. आता याला वर्ष उलटून गेलं आहे. वर्षभरातील पुण्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा पाहिला तर २० एप्रिलपर्यंत एकूण ६२१८ आहे. त्यामध्ये सर्वात अधिक प्रमाण हे पुरुषांचं आहे. तर यामध्ये ४१३७ पुरुष आणि २०८१ महिला आहेत. टक्केवा रीत पाहायचं म्हटलं तर ६७ टक्के पुरुष आणि ३३ टक्के महिलांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

दरम्यान, पुणे शहरात मागील वर्षी एप्रिलमध्ये पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतांचा आकडा वाहत गेला. ऑक्टोबर २०२१२ रोजी पासून रुग्णसंख्येसह मृत्यूचा आकडाही घसरला होता. वर्ष २०२१ च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात हा आकडा १०च्या आतमध्ये होता. परंतु, मार्चपासून रुग्णसंख्येसह मृतांचा आकडाही वाढू लागला. २०२१ च्या एप्रिलमध्ये दररोज मृतांची संख्या ८० वर पोहचली आहे.

पुण्यातील २० एप्रिल २०२१ ची कोरोना मृतांची संख्या –

वय                             पुरुष           महिला       एकूण

६० वर्षांपेक्षा जास्त   –    २७९२            १३७१          ४१६३

४० ते ६०              –    ११२५            ६०९           १७३५

२० ते ४०              –      २१२              ९०             ३०२

२० वर्षांपेक्षा अल्प  –       ८                 १०             १८