Coronavirus : घाबरू नका ! फक्त प्रशासनानं सांगितलेल्या ‘या’ 20 गोष्टी नक्की ध्यानात ठेवा, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हारसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक पुण्यात आहे. त्यामुळे पुणेकर चिंतेत आहेत. मात्र नागरिकांनी दाखवलेली थोडीशी सतर्कता या व्हायरसला हरवू शकते. यासाठी प्रशासनाने सांगितलेल्या काही गोष्टींचे पालक करावे लागणार आहे. प्रशासनाने सांगितलेल्या 20 गोष्टींचे पालन केल्यास कोरोनाचा बिमोड करणं सहज शक्य होऊ शकतं.

प्रशासनाने सांगितलेल्या 20 गोष्टी
1. कोरोनाबाबत फार घाबरू पण नका आणि बिनधास्त पण राहू नका.

2. सर्व खासगी रुग्णालये एका अ‍ॅपद्वारे पेशंट्सचा सर्व डेटा अपडेट करतील तो प्रशासनाला थेट मिळेल.

3. परीक्षा सुरु असलेल्या कॉलेजमध्ये होस्टेल सोडण्याचे आदेश नाहीत.

4. एका व्यक्तीची सर्वांना शिक्षा नको, परदेशवारी करून आलेल्यांनी प्रशासनाला कळवणं बंधनकारक, त्यांनी आपल्याच घरात स्वत:ला आयसोलेट करुन घ्यावं.

5. संशयितांवर बहिष्कार टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार. पण या लोकांनी स्वत:ला घरातच क्वॉरनटाईन घरून घ्यावे, अन्यथा त्यांना तिथून वेगळं केलं जाईल.

6. कालचे चार पॉझिटिव्ह रुग्ण संसर्गामुळेच वाढलेत.

7. आपल्या कुटुंबियांसोबत त्यांनी संपर्कात येऊ नये.

8. शाळा कॉलेजेस बंद असले तरी मुलांनी हॉस्टेल अथवा घराबाहेर पडू नये.

9. काल आम्ही मॉलही बंद केलेत, फक्त त्यातील मेडिकल्स आणि जिवनावश्यक वस्तूंचे स्टोअर्स सुरु राहतील.

10. मास्क लावून कोरोना संशयितांनी आपली ओळख लपवू नये.

11. डीपीडीसी बजेटमधून कोरोना साथ नियंत्रणाचा हा सर्व खर्च केला जाईल.

12. लोकांनी रस्त्यावर मास्क घालून फिरू नये, मास्क हे फक्त मेडिकल स्टाफसाठीच आहेत.

13. संशयितांनी रस्त्यावर फिरूच नये.

14. फस्ट काॅन्टॅक्ट आलेले 4 संशयित पॉझिटिव्ह आढळल्याने चिंता वाढली आहे.

15. खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर सरळ गुन्हे दाखल करू.

16. यापुढे फास्ट कॉन्टॅक्टबाबतही आणखी खबरदारी घेणार, होम क्वॉरनटाईन बाबत अधिक काळजी घेणार.

17. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर येथे अजून एकही कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला नाही.

18. लोकांनी घरं सोडू नयेत, ही विनंती, शासन आदेशाचं पालन करावं.

19. संशयित कुटुंबावर बहिष्कार टाकणं पुरोगामी पुणे शहराला शोभत नाही.

20. सोसायट्यांनी असे प्रकार टाळावेत, अन्यथा संबंधित सोसायटी अध्यक्ष, सेक्रटरींना थेट निलंबित करणार.