Pune Coronavirus | पुणे जिल्ह्यात कोरोना काळात एक हजार 920 पोरं झाली पोरकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Coronavirus | गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेनं देशात, राज्यात धुमाकूळ घातला. अनेकांचा मृत्यु झाला. अनेक बालकांचे पालक (guardian) दगावले. त्यामुळे मुलं पोरकी झाली. या कोरोनाकाळात पालक दगावल्याने कित्येक बालके पोरकी पडलेली आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune Coronavirus) या पोरक्या झालेल्या मुलांची आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यात जवळपास 1 हजार 920 मुलांनी आपल्या पालकांना गमावले आहेत. त्यात काही मुलांना दोन्हीही पालकांना गमवावे लागले. अशी माहिती पुणे जिल्हा कोव्हिड टास्क फोर्सकडून (Pune District Covid Task Force) आली आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पुण्यात (Pune Coronavirus) बाधितांचे प्रमाण अधिक होते. त्याचबरोबर मृतांची संख्या देखील अधिक होती. विशेष म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिक परिस्थिती गंभीर नव्हती. दरम्यान, जिल्ह्यातील 1 हजार 920 मुलांमध्ये वडील पालक गमावलेल्या मुलांची संख्या 1 हजार 621 आहे. त्याचबरोबर आई गमावलेल्या मुलांची संख्या 237 आहे. तर 62 मुलांनी त्यांचे दोन्हीही पालक गमावली आहेत.

सुरवातीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात (Pune) 2 हजार 218 मुलांच्या एक अथवा दोन्हीही पालकांचा मृत्यू (Death of a parent) झाल्याचे सांगितले होते. यापूर्वी काही नावे दोनदा नोंदणी झाली होती त्यामुळे हा आकडा अधिक होता. तसेच ती माहिती अपुरी होती. आता त्यात सुधारणा केली असून पुणे शहरातील (Pune city) 737 आणि पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) 365 आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 748 मुलांना कोरोना काळात त्यांच्या एक अथवा दोन्ही पालकांचा मृत्यू झालाय. बाकी मुले जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या परिसरातील आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिलीय.

दरम्यान,11 ते 14 वयोगटात असणाऱ्या 566 मुलांच्या एका अथवा दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे. 6 ते 10 वयोगटातील 518 मुलं पोरकी झाली आहेत. 15 ते 18 वयोगटातील 493 मुलांनी पालक गमावले आहेत. तर 6 वर्षांपेक्षा कमी असणाऱ्या 335 चिमुकल्यांचे छत्र हरवलेय. 19 ते 23 वयोगटातील 9 तरुणांनी 1 किंवा दोन्हीही पालक गमावलेली आहेत.

Web Title :- Pune Coronavirus | during coronavirus period 1920 children were orphaned pune district, know about it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mahindra Centuro खरेदी करा 24 हजारात, 85 kmpl च्या मायलेजसह मिळेल 12 महिन्यांची वॉरंटी;

Hutatma Express | …म्हणून पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस 3 ते 17 ऑक्टोबरदरम्यान बंद

Haryana Government | खुशखबर ! शेतकर्‍यांना ‘या’ योजनेंतर्गत मिळतील 40,000 रुपये, जाणून घ्या कसा मिळेल फायदा